वेंगुर्ला शहरात रंगपंचमी मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला शहरात बाजारपेठेसह आज बुधवारी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा वर्गासह, युवती, बच्चे कंपनी, महिला भगिनीही विविध रंगात म्हावून निघाल्या होत्या.उद्या गुरुवारी गुढीपाडवा असल्याने शहरात एकच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वेंगुर्ला बाजारपेठ, गाडीअड्डा नाका, कुबलवाडा, महाजनवाडा, हॉस्पिटलनाका, भटवाडी, राऊळवाडा व अन्य चौकाचौकात आदी विविधभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुणाई आबालवृद्धही रंगपंचमीत रंगात न्हावून निघाली होती.होळीपौर्णिमा झाल्यानंतर आज बुधवारी सतराव्या दिवशी रंगपंचमी उत्साही वातावरणात संपन्न झाली.शहरातील देवतांच्या धार्मिक कार्यक्रमासह शिमगोत्सव मंगलमय वातावरणात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.दरम्यान शहरातील प्राथमिक शाळामध्येही रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.

You cannot copy content of this page