सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी योगशिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१८-: फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गच्या वतीने येथील पू. प्रा. शाळा क्र. ४ मध्ये आयोजित करण्यात आलेले योगशिबिर सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

या योगशिबिरात विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, अभ्यासात एकाग्रता वाढावी तसेच मोबाईलच्या अति वापरापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात योगाभ्यास, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून विविध कठीण आसनांचाही सराव करून घेण्यात आला.

राष्ट्र सेवा पुरस्कार प्राप्त योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अकॅडमीचे कार्याध्यक्ष श्री. अनिल मेस्त्री, कोषाध्यक्ष श्री. रवींद्र प्रभू देसाई, श्री. महादेव सावंत, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी धारगळकर तसेच शाळेतील इतर शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी धारगळकर यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन शिक्षक पूजा शिंदे यांनी केले.

You cannot copy content of this page