⚡बांदा ता.१८-: बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच रत्नाकर आगलावे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पं. स. सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच प्रियांका नाईक, पं. स. सदस्या ऋतिका नाईक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, माजी उपसरपंच जावेद खतीब, बाळू सावंत, आबा धारगळकर, ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, देवल येडवे, रुपाली शिरसाट, वाफोली उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच दीपक सावंत, राजा सावंत, ग्रामविकास अधिकारी आदम शहा आदी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांचा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते तर उपसभापती गौरव मुळीक यांचा जावेद खतीब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद कामत म्हणाले, बांदा गावात सत्कार होणे ही माझ्यासाठी ऊर्जा देणारी बाब आहे. गावातील विकास कामांना न्याय देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन, असे अभिवचन दिले. प्रास्ताविक बीडीओ वासुदेव नाईक, सूत्रसंचालन श्रीमती कविटकर तर आभार सरपंच प्रियांका नाईक यांनी मानले.
बांदा ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार…
