बांद्यात गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शविणाऱ्या गुढी पाडवा निमित्त बांदा येथे गुरुवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून उत्सवी वातावरणात नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.
रॅलीची सुरुवात श्री राम चौक, बांदा येथून होणार असून पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गडगेवाडी, इंडेन गॅस एजन्सी, निमजगा, गवळीटेम्ब येथून डावीकडे वळून वाफोली आईरवाडी मार्गे हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभ येथे मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर कट्टा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळसेवाडी, श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, मोर्येवाडा-आळवाडा मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, कट्टा कॉर्नर होत रॅलीची सांगता श्री राम चौक येथे होणार आहे.
या रॅलीच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचे जतन, एकात्मता आणि नववर्षाचा उत्साह साजरा करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. तरी सर्व बांदा परिसरातील हिंदू बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page