सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील नवदुर्गांचे मोठ्या जल्लोषात विसर्जन…
⚡सावंतवाडी ता.०२-: नवरात्रोत्सवाचा समारोपाला सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील नवदुर्गांचे विसर्जन मोठ्या जल्लोषी वातावरणात पार पडले. यानिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका भाविकांसाठी खास आकर्षण ठरल्या. या क्षणाचे साक्षीदार होत या विसर्जन मिरवणूकांत आबालवृद्ध सहभागी झाले होते. या विसर्जन मिरवणुकांमधील देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भवानी माता, साईबाबा, गणपती यांचे हालते देखावे…
