पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधूनहीबाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद…

नगरसेवक देव्या सुर्याजी यांची नाराजी: चोरीच्या घटनेनंतर तरी अधीक्षकांनी दखल घ्यावी..

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधूनही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली.

आज शहरात चोरट्यांनी भर बाजारपेठेत चोरी केलेली असताना पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असते तर तपास काम अधिक वेगाने झाले असते असे मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती. पोलिस अधीक्षकांसह स्थानिक पोलिसांना निवेदन देत याबाबतची मागणी केली होती. मात्र, त्याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. अन्यथा, आज झालेल्या चोरीचा छडा लावताना तपास वेगाने होण्यास मदत झाली असती. खासगी दुकानदारांचे सीसीटीव्ही नसते तर परिस्थिती अधिक गंभीर असती अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page