⚡देवगड ता.०५-:
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजपच्या वतीने ५ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता “इको व्हीलर ग्रुप देवगड सायकल रॅली (देवगड सायकलोथॉन)” उत्साहात पार पडली.
या सायकल रॅलीचा शुभारंभ माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, भाजप सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेवक शरद ठुकरूल, रोहन खेडेकर, उष:कला केळूसकर, ऍड. अभिषेक गोगटे, अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज शेख, माजी नगरसेवक उमेश कणेरकर, बापू जुवाटकर, रविंद्र कोयंडे, विश्वामित्र खडपकर, संजय तारकर, विजय वाळके, ज्ञानेश्वर खवळे, तन्वी शिंदे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इको व्हीलर ग्रुप देवगडच्या वतीने आयोजित या सायकल रॅलीचे दोन गट करण्यात आले होते. शालेय गट (12 वर्षांपर्यंत) आणि खुला गट असे हे दोन विभाग होते. शालेय गटासाठी 11 किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते, तर खुल्या गटासाठी 25 किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले होते.
शालेय गटाचा मार्ग जामसंडे येथील भाजप कार्यालय ते मिठमुंबरी पूल आणि पुन्हा जामसंडे भाजप कार्यालय असा ठेवण्यात आला होता. तर खुल्या गटासाठी जामसंडे भाजप कार्यालय ते कातवण पेट्रोल पंप आणि पुन्हा जामसंडे भाजप कार्यालय असा मार्ग निश्चित करण्यात आला होता.या सायकल रॅलीत सहभागी होऊन पूर्ण अंतर पार करणाऱ्या सर्व सायकलस्वारांना मान्यवरांच्या हस्ते मोफत टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
