⚡बांदा ता.०५-: येथील श्री देव बनखनकर देवस्थान, काळसेवाडी – बांदा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रति वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. ही महापूजा सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता संपन्न होणार आहे.
महापूजनंतर दुपारी १२.०० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० वाजता बांदा येथील महिला मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ८.०० वाजता साटेली येथील माऊली भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
काळसेवाडी-बांदा येथे श्री सत्यनारायण महापूजा…
