स्थापना दिनानिमित्त हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा; विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना ध्वजवाटप..
⚡सावंतवाडी, ता. ५-:
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे ‘भाजपा ध्वज वाटप अभियान’ाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्वज वितरित करण्यात आले.
६ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणारा भाजपाचा स्थापना दिन हा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेसाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा सोहळा ठरत आहे. देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या घरांवर, तसेच मंडल, बूथ आणि शक्ती केंद्र कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने भाजपाचे ध्वज फडकवले जाणार आहेत.
स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित ध्वज वाटप कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री विशाल परब यांनी, “उद्या सावंतवाडी मतदारसंघातील हजारो घरांवर भाजपाचा भगवा ध्वज फडकताना दिसेल आणि संपूर्ण परिसर भाजपामय होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
या ध्वज वाटप कार्यक्रमातून स्थापना दिनाचा उत्साह आणि कार्यकर्त्यांमधील जोश स्पष्टपणे जाणवत होता.
