कणकवलीत खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी स्पर्धा; तब्बल २ लाखांची बक्षिसे…

⚡कणकवली ता.०५-: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे भव्य बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष तथा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत आणि माजी जि.प. सदस्या संजना सावंत यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा होत असून, यासाठी तब्बल २ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

शुक्रवार, १० एप्रिल रोजी हरकुळ बुद्रुक येथील गणेश मंदिराच्या तळ्याच्या माळावर राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन गटांत ही स्पर्धा रंगणार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ३१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार, तृतीय १५ हजार, तसेच ७ हजार रुपये व आकर्षक ढाल अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम १५ हजार, द्वितीय १३ हजार, तृतीय १२ हजार, चतुर्थ ११ हजार, पाचवा १० हजार, सहावा ९ हजार, सातवा ८ हजार, आठवा ७ हजार, नववा ६ हजार आणि दहावा क्रमांकासाठी ५ हजार रुपये व ढाल अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

याशिवाय गावठी गटासाठीही स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली असून अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार व २ हजार रुपये आणि ढाल देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राजू पेडणेकर, निलेश तेली आणि आबू अपराज यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page