सिंधुदुर्गातील खेळाडूंचे तायक्वांदो पंच परीक्षेत यश…

⚡कणकवली ता.०५-:
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.

राष्ट्रीय पंच परीक्षेत कुणाल नारकर व सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले, तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत व श्रीनिधी सावंत यांनी यश संपादन केले.

ही परीक्षा रत्नागिरी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल रत्नागिरी येथे पार पडली. तायक्वांदोमधील तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि आत्मसंरक्षणाच्या विविध अंगांचा कस पाहणारी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत उत्तीर्ण झालेल्या या खेळाडूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशासाठी त्यांना मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संदेश पारकर तसेच पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे आणि अमित जोशी यांनी अभिनंदन केले.

फोटो :

रत्नागिरी येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्गातील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुभाष पाटील उपस्थित होते.

You cannot copy content of this page