Headlines

जगन्नाथराव भोसले उद्यानातील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर पाटकर व श्री. अभिजित गावस यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेने दिले स्वच्छतागृह दुरुस्तीचे आश्वासन सावंतवाडी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : सावंतवाडी नगरपालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृह गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून बंद व दुरवस्थेत असल्याने उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर यशवंत पाटकर…

Read Full News

भटवाडी येथे शुक्रवारी मोफत ‘जन आरोग्य’ तपासणी शिबिर…

जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे: नगरसेविका दिपाली भालेकर यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०८-: प्रभाग क्रमांक १ मधील भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ येथे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून नागरिकांसाठी ‘जन आरोग्य’ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात…

Read Full News

हत्तींचा बंदोबस्त महिनाभरात करा…

अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार:हत्तींचा बंदोबस्त महिनाभरात करा; राजू मसुरकर यांचा वन विभागाला इशारा… ⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपांचा वावर सुरू असून, या हत्तींकडून नागरिकांच्या जीवितासह शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या हत्तींचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना शासकीय प्राणी संग्रहालय अथवा जामनगर…

Read Full News

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे अखेरचे दर्शन घेत आमदार जीत अरोलकर, अॅड. अनिल निरवडेकर यांनी वाहिली श्रद्धांजली

⚡सावंतवाडी, ता.०८-: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर गोवा माद्रें मतदार संघाचे आमदार जीत अरोलकर आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात जाऊन नाना पाटेकर यांचे अखेरचे दर्शन घेतले.आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाना…

Read Full News

कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील बंद सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन:दर बुधवार व शनिवारी मिळणार सोनोग्राफीची सुविधा.. ⚡कुडाळ ता.०८-: जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे मागील काही काळापासून मनुष्यबळाअभावी बंद असलेली सोनोग्राफी सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर बुधवार व शनिवारी सोनोग्राफीची सुविधा…

Read Full News

कुडाळवासीयांना दिलासा! कचरा उचल पुन्हा सुरू…

उत्कर्ष नगरातील जागेला दोन महिन्यांची मुदतवाढ:नारायण राऊळ यांची जागा वापरण्यास परवानगी.. ⚡कुडाळ ता.०८-: गेले दोन दिवस कुडाळवासीयांना भेडसावणारा कचरा प्रश्नावर तात्पुरत्या स्वरूपात तोडगा निघाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उत्कर्ष नगर येथील सुरू असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. जागामालक नारायण वसंत राऊळ यांनी…

Read Full News

आमदार केसरकरांना एवढा विरोध असताना 2024 मध्ये एवढी मतं कशी पडली…?

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल: आम्हाला त्यांच्या मतांवर संशय, चौकशी करा; तर उद्योगमंत्री व पालकमंत्री मोठमोठ्या घोषणा करून थकले.. ⚡सावंतवाडी, ता.०८-: २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार दीपक केसरकर यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विरोधाचे वातावरण होते. असे असतानाही ते एकतर्फी विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या मतांबाबत संशय असून, या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी ठाकरे शिवसेनेचे…

Read Full News

‘नाना’ नावाचा अभिनयाचा दीपस्तंभ अन् युवाईचा आयडॉल हरपला…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला-सृष्टीचे मोठे नुकसान:भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांची भावपूर्ण श्रद्धांजली.. ⚡सावंतवाडी ता.०८-: आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला-सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. एका संवेदनशील कलाकारासह उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अस्सल माणूस गमावल्याची भावना भाजपा राज्य युवा नेते…

Read Full News

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका…

मंत्री नितेश राणे यांची श्रद्धांजली:ना. नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त.. ⚡सिंधुदुर्ग दि.०८-: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ना. नितेश राणे…

Read Full News

नानांच्या निधनाने सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी…

बबन साळगावकर:बेधडक, बिनधास्त व्यक्तिमत्त्वाचा मित्र-कलाकार गमावल्याचे दुःख.. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबातून पुढे येत आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण देशात नावलौकिक मिळविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नाना हे बेधडक, बिनधास्त आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक मित्र आणि कलाकार गमावल्याचे दुःख आहे, अशा भावना…

Read Full News

You cannot copy content of this page