⚡सावंतवाडी, ता.०८-: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या दुःखद निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर गोवा माद्रें मतदार संघाचे आमदार जीत अरोलकर आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात जाऊन नाना पाटेकर यांचे अखेरचे दर्शन घेतले.आपल्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाची मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

नाना पाटेकर यांनी अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांसाठी केलेले कार्यही सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत जीत अरोलकर व अॅड. अनिल निरुडकर यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
