सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर पाटकर व श्री. अभिजित गावस यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपालिकेने दिले स्वच्छतागृह दुरुस्तीचे आश्वासन

सावंतवाडी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : सावंतवाडी नगरपालिकेच्या जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृह गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून बंद व दुरवस्थेत असल्याने उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर यशवंत पाटकर आणि श्री. अभिजित दत्ताराम गावस यांच्या निदर्शनास सुमारे १५ दिवसांपूर्वी ही बाब आली होती. उद्यानात येणाऱ्या लहान मुलांना, नागरिकांना तसेच उद्यान परिसरात भरणाऱ्या आठवडा बाजारातील नागरिक व व्यापाऱ्यांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
या संदर्भात दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेचे कर्मचारी श्री. संजय पोईपकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. तसेच सुमारे १० दिवसांपूर्वी याबाबत माहिती देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
अखेर आज, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी, श्री. ज्ञानेश्वर यशवंत पाटकर आणि श्री. अभिजित दत्ताराम गावस यांनी सहकाऱ्यांसोबत नगरपालिकेत धडक देत संबंधित प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला. यावेळी प्रशासनाने या समस्येची दखल घेत झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
तसेच आठवडा बाजार सुरू होण्यापूर्वी जगन्नाथराव भोसले उद्यानातील स्वच्छतागृहाची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती करून ते नागरिकांच्या वापरासाठी योग्य स्थितीत करून देण्यात येईल, असे आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आले.
जगन्नाथराव भोसले उद्यानातील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने वेळेत लक्ष देऊन उद्यानातील स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता व देखभाल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर पाटकर, श्री. अभिजित गावस यांनी केली