जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे: नगरसेविका दिपाली भालेकर यांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०८-: प्रभाग क्रमांक १ मधील भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ६ येथे शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून नागरिकांसाठी ‘जन आरोग्य’ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ यांच्या माध्यमातून हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असून, नागरिकांची विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, किडनी, लिव्हर आदी तपासण्यांचा समावेश आहे.
भटवाडी तसेच बाहेरचावाडा परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
