Headlines

नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका…

मंत्री नितेश राणे यांची श्रद्धांजली:ना. नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त..

⚡सिंधुदुर्ग दि.०८-: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ना. नितेश राणे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

ना. नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अभिनयातील वादळ, रोखठोक बाणा आणि शेतकऱ्यांच्या हाकेला धावून जाणारा सहृदयी माणूस म्हणून नाना पाटेकर यांची ओळख होती. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ असा आपल्या अभिनयाचा प्रवास गाजवणारा हा राष्ट्रभक्त कलाकार आज आपल्यात नाही, यावर विश्वासच बसत नाही, असे त्यांनी नमूद केले.

नाना पाटेकर यांच्या निधनाने झालेली हानी कधीही भरून न येणारी आहे, अशा भावना व्यक्त करत नितेश राणे यांनी नानांना विनम्र श्रद्धांजली व भावपूर्ण आदरांजली वाहिली.“ॐ शांती!”असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

You cannot copy content of this page