देवगड तालुक्यातील रस्त्यावर गतिरोधक घाला..

सार्वजनिक बांधकामकडे सतीश सावंत यांची मागणी 💫 *देवगड*:-देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी बसस्टॉप , फणसे तिठा गणपती मंदिर ,पडवणे पालये तिठा, वाडा आंबेडकर चौक या ठिकाणी रस्त्यावर त्वरीत गतिरोधक बसविण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व गटनेते सतिश सावंत यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

अखेर जानवली सरपंचपदी भाजपाच्या शुभदा राजेश रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर…

भाजपाचा गड माजी जि.प.उपाध्यक्ष रंजन राणे, जि.प.सदस्या श्रिया सावंत यांनी राखला *💫कणकवली दि.२०-:* लक्षवेधी ठरलेल्या जानवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या शुभदा राजेश रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. लोकनियुक्त माजी सरपंच आर्या राणे यांच्या राजीनाम्यानंतर आज जानवली सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,…

Read More

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच सावंतवाडीत आगमन…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले स्वागत सावंतवाडी दि.२०-: महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या वतीने सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले आहे. खाजगी कामानिमित्त गोवा येथे जात असताना त्यांनी सावंतवाडीत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची त्यानी भेट घेतली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,हिद्दायत्तुला खान,चित्रा देसाई…

Read More

ठिणगी पडली अन् सुदैवाने अनर्थ टळला…

समीर नाईक यांनी दाखवली तत्परता : वीज तारांना लागणारी झुडपे तोडण्याची मागणी *💫बांदा दि.२०-:* भर दुपारच्यावेळी पाडलोस केणीवाडा येथे माडाचे झावळ विद्युत वाहिनीवर पडल्यामुळे दोन्ही वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श झाला व ठिणगी पडून आग लागण्याची घटना घडली. परंतु युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पावसाळा तोंडावर…

Read More

अथर्व सावंत, सुजाता टिकले प्रथम..

नाथ पैचा निकाल जाहीर मालवण (प्रतिनिधी) बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. रेखाचित्र स्पर्धेत अथर्व सावंत, तर वक्तृत्व स्पर्धेत सुजाता टिकले यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. रेखाचित्र स्पर्धेचा उर्वरित निकाल : द्वितीय-बाबाजी सावंत, मयुर पवार, यशदा आंगणे, तृतीय ऋग्वेद चव्हाण, अनुष्का मेथर, दुर्ग दाभोळकर, अवंती बारसकर, मृणाली पवार,…

Read More

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइजचा फेडरेशनचा बँक खाजगीकरणला विरोध..

राष्ट्रवादी पक्षाचा जाहीर पाठीबा; बँक खाजगीकरण विरोधी जन अभियान सुरु *💫सावंतवाडी दि.२०-:* ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीनं संघटनेच्या ७६ व्या वर्धापनदिनाच औचित्य साधत २० एप्रिल पासून बँक खासगीकरण विरोधी जन अभियान राबविण्यात येत आहे. या जन अभियानाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष…

Read More

कोळब येथील गेस्ट हाऊसमध्ये कोरोना सेंटरची परवानगी मिळावी…

निलक्रांती मत्स्य संस्थेचे अध्यक्ष तोरसकर यांची मागणी *💫मालवण दि.२०-:* निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेच्या कोळंब येथील गेस्ट हाऊसमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे. कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव निलक्रांती संस्थेकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. निलक्रांती…

Read More

बांदा बंदला कडकडीत प्रतिसाद…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता निर्णय;सरपंच अक्रम खान यानी व्यक्त केले आभार 💫 *बांदा दि.२०*:-काल बांदा ग्रामपंचायत ,व्यापारी संघ, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज बांदा ग्रामपंचायत क्षेत्रात कडकडीत बंद पाळून नागरिकांना १००टक्के प्रतिसाद दिला. आज शहरात पोलिस व होमगार्ड यांचेकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. लोकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सरपंच…

Read More

मळगांव येथे रात्री डंपर झाला पलटी..

डंपरचे नुकसान:जीवितहानी नाही *💫सावंतवाडी दि.२०-:* मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे एका डंपरला अपघात झाला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा डंपर रस्त्या शेजारी असणारी झाडीत हा डंपर जाऊन पलटी झाला आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली आहे. या अपघातात डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Read More

फादर फिलिप डिसोजा यांचे निधन…

*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हसतमुख, शांत आणि संयमी प्रेमळ फादर म्हणून ओळखले जाणारे फादर फिलीप डिसोजा यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या फादर या कारकिर्दीत सिंधुदुर्ग डायसिस मधील अनेक चर्च मध्ये आपली याज्ञिकी सेवा बजावली होती. येशू ख्रिस्ताची शिकवण दिली होती. फा. डिसोजा हे उत्तम प्रवचनकार होते. गेल्या…

Read More
You cannot copy content of this page