*💫सिंधूदुर्गनगरी दि.०५-:* कोव्हीड 19 विषाणू प्रादुर्भाव काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी कुडाळ तालुका शिक्षक समिती तालुका महिला आघाडी चा शैक्षणिक पाऊल – स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आदर्शवत व दिशा दर्शक ठरेल असे गौरवोद्गार कुडाळ पं स सभापती सौ नूतन आईर यांनी अल्पबचत सभागृह पं स कुडाळ येथे संपन्न झालेल्या पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी उपसभापती श्री जयभारत पालव, गटविकास अधिकारी श्री विजय चव्हाण, प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष श्री राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस श्री सचिन मदने, जिल्हा शिक्षक नेते श्री नंदकुमार राणे, जिल्हा उपाध्यक्ष श्री चंद्रसेन पाताडे, महिला आघाडी राज्य सल्लागार सौ सुरेखा कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री चंद्रकांत अणावकर, तालुकाध्यक्ष श्री प्रसाद वारंग, महिला आघाडी अध्यक्षा सौ संजना राऊळ, सरचिटणीस श्री महेश कुंभार, प्रवक्ता विजय सावंत, महिला आघाडी उपाध्यक्षा सौ सानिका मदने, सचिव सौ भार्गवी कापडी, कार्याध्यक्षा स्मिता मते, कोषाध्यक्ष सौ पूर्वा गावडे, सहसचिव सौ चैत्राली पाटील व सौ शितल गोसावी, प्रसिध्दी प्रमुख सौ प्रमिला चव्हाण, शिक्षण विभाग वरिष्ठ सहाय्यक कुणाल तेंडुलकर आदी उपस्थित होते. कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक समिती तालुका महिला आघाडी च्या तालुक्यातील महिला शिक्षिकांनी एकत्र येत कोव्हीड 19 विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती मुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक पाऊल स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करत या उपक्रमाची पुस्तिका प्रकाशन सोहळा कुडाळ पंचायत समिती अल्पबचत सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्राथमिक शिक्षक व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. यावेळी या उपक्रमात सहभागी होणा-या महिला शिक्षिकांचे सत्कार सभापती सौ नूतन आईर, उपसभापती श्री जयभारत पालव, गटविकास अधिकारी श्री विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षक समितीच्या महिला आघाडीने स्वयंअध्यन कार्ड निर्मिती उपक्रम पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांप्रति आपली बांधिलकी जोपासली आहे ही बाब कौतुकास्पद आहे हा उपक्रम आपण स्वतः मान मुख्यकार्यकारीअधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना सादर केला जाईल संपूर्ण जिल्हयातील इ 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील व अशा शैक्षणिक उपक्रमासाठी कुडाळ पंचायत समिती सर्वोतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन कुडाळ गटविकास अधिकारी श्री विजय चव्हाण यांनी व्यक्त केले. पंचायत राज स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कुडाळ पंचायत समिती राज्यात पहिली आल्याबद्दल सभापती सौ नूतन आईर व गटविकास अधिकारी श्री विजय चव्हाण यांचा कुडाळ तालुका शिक्षक समिती तालुका महिला आघाडी व शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दर आठवड्याल इ 1ली ते 7 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित स्वयंअध्ययन कार्ड या उपक्रमातून तयार करण्यात येणार असून तयार केलेली कार्ड पी डी एफ करून वाटसप, सोशल मिडियावरून तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. स्वतः पालकही या कार्ड च्या माध्यमातून आपल्या पाल्याचा अभ्यास घेऊ शकतात. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यातील एकूण 38 महिला शिक्षिकांनी एकत्र येत स्वयंअध्यन कार्ड निर्मिती केलेली आहे. हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्याच्या दृष्टीने संघटनापातळीवर प्रयत्न केले जातील असे जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम यांनी स्पष्ट केले तर अशा शैक्षणिक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष तथा जिल्हासरचिटणीस श्री सचिन मदने यांनी स्पष्ट केले. कुडाळ तालुका महिला आघाडी शिक्षिकांची एकजूट व विद्यार्थ्यांप्रति विशेष बांधिलकी ही कौतुकास्पद असल्याचे राज्य उपाध्यक्ष श्री राजन कोरगावकर यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक श्री चंद्रकांत अणावकर, जिल्हा शिक्षक नेते श्री नंदकुमार राणे यांनी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष श्री प्रसाद वारंग यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला तर प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा सौ संजना राऊळ, सूत्रसंचालन सौ सानिका मदने, आभार सचिव सौ भार्गवी कापडी यांनी केले. सदर उपक्रमास शिक्षक समिती च्या तालुक्यातील व जिल्हा पदाधिकारी यांनी देणगी स्वरूपात स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सरचिटणीस श्री महेश कुंभार व तंत्रस्नेही शिक्षक श्री संजय गावडे यांचे विशेष सत्कार करण्यात आला.
शिक्षक समिती तालुका महिला आघाडीचा स्वयंअध्ययन कार्ड निर्मिती उपक्रम आदर्शवत- नूतन आईर
