*💫मालवण दि.०४-:* भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी टायगर ग्रुप यांच्यावतीने ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजता बांगीवाडा समाजमंदिर येथे ‘एक वही एक पेन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक लोक, अनुयायी हार, फुल घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी ही फुले वाया जातात. परंतु एक वही एक पेन अभियानाअंतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही व पेन जमा करण्याचे आवाहन टायगर ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमा होणाऱ्या वह्या, पेन गरीब गरजू विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन टायगर ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.
मालवणात ६ रोजी टायगर ग्रुपतर्फे एक वही एक पेन अभियान
