तलावाकाठील परिसर होणार आता दररोज स्वच्छ….

आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

*💫सावंतवाडी दि०४-:* शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी आज पासून नेहमी संध्याकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी दिली आहे. तशा प्रकारचे आदेशच त्यानी आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरातील मोती तलावाकाठी रोज संध्याकाळी विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन बसत असतात परंतु तळ्याकाठी भटके प्राणी आणि विविध माध्यमातून अस्वच्छता होत असल्याने त्याचा त्रास त्या नागरिकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी हा निर्णय घेतला आहे.

You cannot copy content of this page