जिल्ह्यातील १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण
*💫कुडाळ दि०४-:* जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरू व हुशार अशा १५१ विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आली. या शिष्यवृत्तीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेच्या सानिया विलास गावडे, करुणा संतोष तळेकर, प्रथमेश श्रीकांत हडकर, हर्षल सुभाष परुळेकर व अभिषेक उमेश सारंग या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ग्लोबल फाऊंडेशन कुडाळचे विभागीय प्रमुख प्रसाद परब व त्यांचे सहकारी लक्ष्मण देसाई यांच्या मार्गदर्शनाने ही शिष्यवृत्ती मंजूर झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात दिवाळी सणामध्ये प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले. या शिष्यवृत्तीसाठी प्रशालेचे शिक्षक प्रभू पंचलिंग यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देसाई , सर्व पदाधिकारी व प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी ग्लोबल फाऊंडेशनचे आभार मानले.