*💫मालवण दि.०५-:* स्थानीक आमदार श्री वैभव नाईक यांनी जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येवर मार्ग न काढता स्वतः चा दिखाऊपणा करून, जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्या आपण सोडवल्या असा आभास निर्माण करून व्यावसाईकांनी आपल्या स्वःकष्टातुन दिलेला फुलांच्या बुके स्विकारला मात्र जबाबदारी स्वीकारली नाही. येणाऱ्या काळात त्यांनी हा बेजबाबदारपणा, बालिशपणा सोडावा आणि मच्छीमार समाजासाठी आत्मीयतेंने काम करावे. असा टोला भाजप प्रवक्ते तथा टी टी डी एस अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे. कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी, क्यार, निसर्ग वादळाने संकटात असलेला जलपर्यटन व्यावसाईक जलक्रिडा साठी नियमावली (sop) जाहीर करत आहे यांची वाट बघत बसलेला असतानाच स्कूबा डायव्हीग, बोटींग, वाँँटर स्पोर्ट बंदी चे आदेश प्रशासनाकडुन देण्यात आले आहेत हा सर्व विषय पर्यटनाशी जोडला असल्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आज या व्यावसाईकांना सरकारने कोरोना काळात एक रुपयाची मदत केली नाही आहे. आता हे व्यावसाईक स्व:कष्टाने व्यवसाय करून पोट भरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर ठाकरे सरकार फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना देशोधडीला लावत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी हा विषयी पुढाकार घेऊन अधिकृत परिपत्रक (sop) जाहीर करावे. अन्यथा होणाऱ्या व्यावसाईकांच्या उद्रेकांस ठाकरे सरकार जबाबदार राहील. असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. आम्ही जल पर्यटन व्यावसाईकांच्या सोबत असून जलपर्यटन व्यावसाईकांस अपेक्षित असलेल्या मोबदलांसाठी पुढील काही दिवस जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनी काम करावे अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते व टी टी डी एस अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे .
आमदार वैभव नाईक यांनी बालिशपणा सोडून मच्छीमारांसाठी आत्मीयतेने करावे काम – बाबा मोंडकर
