अपघातात तिघे सुदैवाने बचावले;जीवितहानी टळली..
*💫कणकवली दि.०५-:* कणकवलीकडून कुंभवडेकडे जात असताना नरडवे रोड वरील माऊली देवी देवस्थानच्या प्रवेशव्दारासमोर होंडाई कारचा अपघात घडला. हा अपघात १२.४० वाजतच्या सुमारास घडला.कारचालक भरधाव वेगात असल्याने तब्बल तीन- चार पलटी मारत ही कार रस्त्याशेजारी गटारानजीकच्या झाडावर ठोकरली.सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली. या गाडीतील २ पुरुष प्रवासी व १ मुलगी या तिघांनाही किरकोळ दुखापत झाले. येथून जात असणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड ,सामजिक कार्यकर्ते उमेश वाळके,सुनील काणेकर यांनी पोलीसांना माहिती दिली.तसेच रुपेश साळुंखे,श्री.काणेकर आदींनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस पांडुरंग पांढरे,सुरेश शेडगे,एएसआय सावंत,आप्पा पाटील आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.