कणकवली खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा; प्रति क्विंटल २५६८ रुपये मिळणार दर..
*💫कणकवली दि.०५-:* महाराष्ट्र शासनामार्फत भात खरेदी यावर्षी वेळेत सुरु झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आठवड्यापूर्वी भात खरेदी सुरु करण्यात आली आहे.शनिवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या भात विक्रीसाठी रांगा लागल्या होत्या. कणकवली खरेदी-विक्री संघामार्फत आतापर्यंत ७५८ क्विंटल भात खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ६ हजार क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४९ भात खरेदी केंद्र मंजूर करण्यात येत आहे. क्विंटल २५६८ रुपये मिळणार दर मिळणार आहे. कुडाळ, कणकवली व सावंतवाडी मध्ये काही केंद्रांवर भात खरेदी सुरु करण्यात आली. शासनाने यावर्षी १८६८ रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमधून भात खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याने यावर्षी वेळेत भात विक्रीसाठी शेतकऱ्यांना संधी मिळाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी हमीभावा मध्ये ५३ रुपयांची वाढ शासनाकडून करण्यात आली होती. यातच नुकताच शासनाने प्रति क्विंटल ७०० रुपये हमीभाव जाहीर केल्याने खाजगी मिलरला देण्याऐवजी सहकारी सोसायट्या व खरेदी-विक्री संघामार्फत सुरू केलेल्या भात खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी शेतकरी पसंती देत आहेत. भात खरेदी केंद्रावर भात दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व नुकसानही टाळले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.