वैभववाडीचे पो. काँ. संदीप राठोड यांचा सोनाळी ग्रामस्थांकडून सत्कार.
*💫वैभववाडी दि.०४-:* तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा शोध लावत तो मोबाईल मालकाला परत केला आहे. पोलीस राठोड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व संदीप राठोड यांचे मोबाइल मालक किशोर भोसले व सोनाळी ग्रामस्थ यांनी आभार मानले. किशोर भोसले रा. सोनाळी यांचा मोबाईल सोनाळी ते वैभववाडी या मार्गावर हरवला होता. मोबाईल हरवल्याची माहिती त्यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस संदीप राठोड यांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्या मोबाईलचा शोध लावला. ज्या व्यक्तीकडे मोबाईल होता, त्या व्यक्तीपर्यंत पोलिस अलगद पोहचले. तो मोबाईल पोलिसांनी घेत मूळ मालक किशोर भोसले यांला दिला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत केलेल्या कामगिरीबद्दल उद्योजक अशोक चव्हाण यांनी अतुल जाधव, संदीप राठोड यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, सोनाळी ग्रामस्थ भीमराव भोसले, सचिन कदम, संदीप शिंदे, अनिकेत तांबे व प्रदीप तांबे आदी उपस्थित होते.