पालकमंत्री उदय सामंत यांचे ऑनलाईन बैठकीत आवाहन
*💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* शासनाच्या आवास योजनेत सिंधूदुर्ग राज्यात प्रथम आहे, हे अभिमानास्पद आहे. परंतु याच्यावर समाधानी न राहता महा आवास अभियानमध्ये आपल्याला राज्यात प्रथम क्रमांक टिकवायचा आहे. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यानी समन्वयाने काम केले पाहिजे. ज्या २८६ लाभार्थीना जागा नाही. त्यांची यादी तयार करून यातील किती जणांना शासकीय जागा देता येईल. किती लोकांना खाजगी जागा घ्यावी लागेल, याचा आराखडा तयार करा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यानी शुक्रवारी महा आवास अभियानच्या ऑनलाईन संपन्न झालेल्या जिल्हास्तरिय कार्यशाळेत प्रशासनाला दिले.