अंकुर निवारा केंद्रातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण…
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा पुढाकार; प्रशिक्षणातून रोजगार निर्मितीचा संकल्प.. सावंतवाडी : समाजसेवा आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आता निराधार व हतबल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ‘व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला’ हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात या उपक्रमांतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षणांना सुरुवात झाली आहे….
