देव्या सुर्याजीं आक्रमक: दोन दिवसांत कार्यवाही व शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा…
सावंतवाडी : योगा, मेडीटेशन सेंटरच्या इमारती खाली पाण्याची नैसर्गिक स्त्रोताची पाईपलाईन असून ती फुटली आहे. काम करण्यापूर्वी ती अन्यत्र मार्गाने हलवण आवश्यक होत. मात्र, बांधकाम व पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी ते केलं नाही. त्यामुळे भविष्यात पाइपलाइन ची कोणती अडचण निर्माण झाल्यास नव्यानं बांधकाम केलेल्या कोट्यावधी च्या योगा सेंटरची तोडफोड करणार का असा सवाल शिवसेना नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला.
नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले, नरेंद्र डोंगरावरील ५ लाख लीटरच्या टाकीवरून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. इथे नैसर्गिक स्त्रोताच्या माध्यमातून देखील पाणी येते. झऱ्याच्या माध्यमातून येणार पाणी ही सावंतवाडीकरांसाठी दैवी देणगी आहे. मात्र, मेडीटेशन आणि योगा सेंटरच काम करत असताना ही लाईट फुटली आहे. आज त्यावर मलमपट्टी केली असून नगरपरिषद बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाकडून यावर कार्यवाही होण आवश्यक होतं. जमीनीखालील असणारी ही पाईपलाईन शेजारील भागातून हलवणं आवश्यक होत. मात्र, तस झालं नसून जुलै महिन्यात देखील लोकांना पाणी पुरवठा होत नाही. लोकांना एकवेळ पाणी मिळत नसून ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले लोक ग्रामीण भागच बरा असं म्हणत आहेत. न.प. अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे भविष्यात योगा सेंटरच्या इमारत बांधकामानंतर पाईपलाईन लिकेज झाल्यास नव्यानं बांधल्या जाणाऱ्या इमारतीची तोडफोड करणार का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. तर दोन दिवसांत यावर कार्यवाही झाली नाही, शहराला दोन वेळ पाणी पुरवठा पुर्ववत केला नाही तर सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये अनोख्या स्वरुपात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा कडक इशाराही दिला.
