Headlines

चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीला भाजप; चौकुळ-बेरडकीत पत्रे व कौलांचे वितरण…

जि.प. सदस्य संदीप गावडे व पं.स. उपसभापती गौरव मुळीक यांच्या उपस्थितीत आपत्तीग्रस्तांना दिलासा..

⚡सावंतवाडी, ता.०६-: चौकुळ-बेरडकी परिसरात अलीकडेच झालेल्या चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांची छप्परे उडून गेली असून पत्रे व कौलांचेही मोठे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांवर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना पत्रे व छपरासाठी कौलांचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे आणि सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच घरे पुन्हा उभी करण्यासाठी आवश्यक असलेली पत्रे व कौलांचे वितरण केले.
या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तत्पर सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
यावेळी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, गेळेचे सरपंच सागर ढोकरे, अच्युत गावडे, दयानंद गावडे तसेच चौकुळ गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page