Headlines

दोडामार्ग मनसे शहराध्यक्षपदी मधुसूदन (दादा) खांबल यांची नियुक्ती…

⚡दोडामार्ग ता.२३-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मान्यतेने तसेच पक्षाचे नेते शिरीषजी सावंत, संदीपजी दळवी आणि गजाननजी राणे यांच्या परवानगीनंतर दोडामार्ग शहराच्या प्रभारी शहराध्यक्षपदी मधुसूदन (दादा) खांबल यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
नियुक्ती जाहीर होताच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मधुसूदन (दादा) खांबल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक मजबूत करून दोडामार्ग शहरात मनसेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी त्यांनी योगदान द्यावे, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मालवण उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईडकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्यासह राजू कासकर, राकेश परब, चिन्मय नाडकर्णी, सतीश आकेरकर, काशिराम गावडे, विष्णू वसकर, महेश वरक, पांडुरंग जाधव, सागर जाधव, साईदत्त कदम, रोहित पांचाळ, विठ्ठल जाधव, राज जाधव, समीर म्हापणकर, दादू शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोडामार्ग शहरातील पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात शहरात मनसेच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page