Headlines

प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातील हरिनाम वीणा सप्ताहाची आज सांगता…

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा विठ्ठल सेवेत सहभाग..

⚡सावंतवाडी, ता. २३-:
सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम वीणा सप्ताहाची आज सांगता होत आहे. सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहादरम्यान दररोज वारकरी भजन, हरिनाम संकीर्तन, कीर्तन तसेच सांगीतिक कार्यक्रम होत असून भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत विठ्ठल सेवेत सहभाग नोंदविला.
यावेळी सभापती आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर यांच्यासह विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या समारोपानिमित्त विविध धार्मिक विधी आणि हरिनामाच्या गजरात कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

You cannot copy content of this page