बांदा गडगेवाडीत सापडला मृतावस्थेत माकड
बांदा ता.०९-:* बांदा शहरात गडगेवाडी येथे भर वस्तीत आज माकड मृतावस्थेत आढळले. स्थानिकांनी याची कल्पना तात्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने मृत माकडाची व्हील्हेवाट लावली. काही वर्षांपूर्वी बांदा शहरात माकडतापाने थैमान घातले होते. २० हुन अधिक जणांचे माकडतापाने बळी घेतले होते. तर शेकडोंच्या संख्येने माकडे मृतावस्थेत आढळली होती. या पार्श्वभूमीवर शहरात मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली….
