संजय गांधी निराधार योजना शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.०८-:* महसूल विभाग, वन विभाग व मालवण तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणमध्ये संजय गांधी निराधार योजना शिबिर पार पडले.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराअंतर्गत १५६ उत्पन्न दाखले, ९५ हयातीचे दाखले, ७० नविन संजय गांधी निराधार योजना प्रकरणाचे अर्ज स्वीकारण्यात आले. या शिबिराला आम. वैभव नाईक यांनी भेट देऊन या शिबिर आयोजनाचे कौतुक केले. संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी हे समजत शेवटच्या स्तरावर असतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करताना त्यांना तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आजच्या शिबिरामुळे या प्रक्रियेत सुसूत्रता येऊन लाभार्थ्यांचा आणि अधिकारी, कर्मचारी यांचाही वेळ वाचला आहे.

असे शिबीर यापुढेही आयोजित करण्यात यावे. तसेच रेशन कार्ड बाबतही शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे यावेळी आम. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार पाटणे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी यांनीही मनोगत व्यक्त केले. या शिबीरात नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, उदय मोंडकर, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील कर्मचारी यांनी सहभागी होऊन नागरिकांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महेश जावकर, बाबी जोगी, शीला गिरकर, संमेश परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, प्रमोद कांडरकर, शेखर भैरवकर पंकज सादये, अरविंद मोंडकर, संजय कासवकर, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, उदय दुखंडे, यशवंत गावकर, अनुष्का गावकर, सुनील पाताडे आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page