मालवण (प्रतिनिधी) सन्मित्र स्पोर्ट्स क्लब मालवण यांच्यावतीने मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन भंडारी एज्युकेशन सोसायटी ( मालवण ) मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजा देसाई, सचिव प्रमोद मोहिते, ज्येष्ठ खेळाडू बाळा मुणगेकर, आपी मेस्त्री, पोलीस शिपाई सिद्धार्थ कांबळी पोलीस, मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक हणमंत तिवले, शिक्षक श्री. एस के कांबळे, सौ. अस्मिता वाईरकर, सौ. सरोज बांदेकर, श्रीमती मेस्त्री सौ संजना सारंग आदी व इतर उपस्थित होते. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत निमंत्रित संघ तसेच जिल्ह्याबाहेरील नवी मुबंई, जामनेर (जळगांव), टेबुणी (सोलापूर) डोंगराईकडेपुर, धरणगुत्ती अशा १४ संघांनी सहभाग घेतला आहे . सायंकाळी या स्पर्धेस प्रारंभ होऊन प्रकाशझोतात सामने पार पडले. यावेळी जिल्ह्यातील शूटिंगबॉल खेळाडू आणि क्रीडाप्रेमीं उपस्थित होते.
