केशवसुत कट्ट्याजवळ विद्युत वाहिनीचा स्पार्क

सामाजिक बांधिलकीच्या सदस्यांमुळे अनर्थ टळला

सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी केशवसुत कट्ट्यावर जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या दिव्यांच्या खांबांना विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन मोठा स्पार्क झाला आहे. यावेळी तेथील चार खांबांना विद्युत वहिनी चिकटली होती. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला असून, सुदैवाने त्या ठिकाणी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबतची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकीचे सदस्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तसेच महावितरणचे कर्मचारी तेथे येई पर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने तेथे उपस्थित राहत लक्ष ठेवले.

You cannot copy content of this page