जिल्ह्यातील पहिला प्रयत्न:७५६ गावांना होणार फायदा;
न्यू हेल्थ फाउंडेशनचा पुढाकार
सावंतवाडी ता.०९-:* सदुरू बालदत्तनाथ मेमोरियल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट ऑफ युरोसायन्सेस आरवली सोनसुरे शिरोडाच्यावतीने न्यू हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून सोनसुरे शिरोडा येथे जिल्ह्यातील पहिली नियमित धर्मादाय नेहरू क्लीनिक उभारत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे 756 गावांना होणार असून, फाउंडेशनच्या उपक्रमाचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले.अर्चना फाऊंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली न्यूरो हेल्थ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी भारतीय सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्टर मोहनी भटजीवाले, सुधीर प्रभूदेसाई, नितीन जाधव, श्किशोर महाले, अश्विन चिकणे, अर्चना जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. निग्रो फाउंडेशनला दिलेल्या पत्रात मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय की, सोंनसुरे शिरोडा येथील प्रस्तावित धर्मादाय रुग्णालयाच्या तुमची डीपीआर पहिली आहे. जिल्ह्यातील सुमारे 756 गावांच्या फायद्यासाठी पहिलं नियमित धर्मादाय न्यूरो क्लीनिक सुरू केल्याबद्दल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करतो.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाचं वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने फाऊंडेशनच्या माध्यमातून शिरोडा येथे उभारण्यात येत असलेल्या धर्मादाय मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या प्रकल्पाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पत्रात पुढे म्हटले की इन्स्टिट्यूट ऑफ युरोसायन्सेस हे या प्रकल्पामधील एक प्रमुख वैशिष्ट्य असून अशा अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे संपूर्ण जिल्ह्याला रुग्णांसाठी मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांच्या हितासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विविध शासकीय आरोग्य योजना तुमच्या धर्मादाय रुग्णालयात राबवण्यास आम्हाला आनंद होईल
