बांदा ता.०९-:* बांदा शहरात गडगेवाडी येथे भर वस्तीत आज माकड मृतावस्थेत आढळले. स्थानिकांनी याची कल्पना तात्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने मृत माकडाची व्हील्हेवाट लावली.
काही वर्षांपूर्वी बांदा शहरात माकडतापाने थैमान घातले होते. २० हुन अधिक जणांचे माकडतापाने बळी घेतले होते. तर शेकडोंच्या संख्येने माकडे मृतावस्थेत आढळली होती. या पार्श्वभूमीवर शहरात मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. येथील युवक रुपेश माने यांनी याची कल्पना सर्वप्रथम सरपंच अक्रम खान यांना दिली. खान यांनी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांना माहिती दिल्यानंतर तात्काळ वनखात्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत माकडाचा पंचनामा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
