प्रविण भोसलेचा आरोप; राष्ट्रवादीकडून सावंतवाडीत हल्ला करण्याचा करण्यात आला निषेध
सावंतवाडी ता.०९-: शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्या मागे विरोधी पक्षाचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी राज्यामंत्री प्रविण भोसले यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहेत. दरम्यान हल्ल्या करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग हिदयतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकर राजगुरू, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग जावेद शेख, अर्षद बेग, तालुका उपाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग याकुब शेख, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे, महिला तालुकाध्यक्ष सौ. रिद्धी परब, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, काशिनाथ दुभाषी, राकेश नेवगी, कौसतुभ नाईक, किरण सावंत, निलेश म्हाडगुत, महादेव नाईक, महिला सरचिटणीस सौ. रंजना निर्मळ, माजी सभापती आर. के. सावंत, मनोज वाघमोरे, जिल्हाध्यक्ष व्ही. जे. एन. टि. अशोक पवार, तालुकाध्यक्ष पदवीधर संघ प्रसाद दळवी, संदीप राणे, शफीक खान, असिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा तालुका कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
