अर्चना घारे-परब;खऱ्या गुन्हेगारांचा सीआयडीमार्फत तपास करण्याची केली मागणी
सावंतवाडी ता.०८-:* शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा अत्यंत घृणास्पद व लाजिरवाणी घटना आहे.या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करत असून एसटी कर्मचाऱ्यांच्या आडून जीव घेणा हल्ला करणार्या खर्या गुन्हेगारांना न्यायालयाने शासन करावे, राज्य शासनाने याबाबत गुन्हा नोंदवून सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी सावंतवाडी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिली असून आपली भूमिका मांडली आहे यात असे म्हटले आहे की पवार साहेबांच्या कुटुंबियांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आपण तीव्र निषेध करते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला खाली मान घालायला लावणारी ही घटना आहे पण तरीही सुप्रिया ाई या हिंसक जमावाला खूप घरी याने संयमाने मी प्रगल्भतेने सामोर्या गेल्या मात्र या एसटी कर्मचाऱ्यांच्या अडून जीवघेणा हल्ला करणार्या खऱ्याखुऱ्या गुन्हेगारांना न्यायालयाकडून शासन करावे महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती असून तिला जपण्याचे काम आमचे नेते करत आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संयमाने वागत आहेत अन्यथा आम्हालाही जशास तसे उत्तर देता येऊ शकते तर या हल्ल्यात तत्परता दाखवून वीज हिंसक जमावाने नियंत्रित केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे
