शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला हा लोकशाहिला काळीमा फासणारी घटना

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांची टीका

कणकवली 8 एप्रिल (प्रतिनिधी)- मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार साहेबांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत.

इथून पुढे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक असणार आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला मग आज हे आंदोलन करण्याची गरज काय ?एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार यांनी सातत्याने बैठका घेतल्या होत्या ते कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच आहेत मात्र काही मंडळीनी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही असे राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक म्हणाले.

You cannot copy content of this page