Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात भव्य रक्तदान शिबिर…

मच्छीमारांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मोफत नोंदणी सुविधाही उपलब्ध..

⚡देवगड ता.१९-:
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी देवगड मंडळाच्या वतीने रविवारी (दि. २१ जून) सकाळी ९ वाजता जामसंडे येथील मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भाजप देवगड मंडळाचे अध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरासोबतच मच्छीमार बांधव व मत्स्य व्यवसायाशी संबंधित महिला-पुरुषांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय मत्स्य विकास पोर्टल (NFDP) वर मोफत नोंदणी, मत्स्य विभागाच्या विविध योजनांची माहिती, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, सिंधुरत्न योजना, मच्छीमारांसाठी विशेष किसान क्रेडिट कार्ड सुविधा तसेच मत्स्य व्यवसायासाठी वीज दर सवलतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय नौका नोंदणी, परवाने आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध कायदेशीर बाबींविषयी तज्ज्ञांकडून माहिती दिली जाणार आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच वारसदारांची आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मच्छीमार बांधव, मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेले नागरिक तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी देवगड मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page