Headlines

निम्मेवाडी–चव्हाटा मंदिर पायवाटीच्या चिरेबंदी कामाचे भूमिपूजन…

नगरसेवक राकेश राणे यांच्याहस्ते झाले भूमिपूजन

⚡कणकवली ता.१९-: शहरातील निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर या परिसरातील पायवाट गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. देवतरंग देवस्थळी ये-जा करणाऱ्या भाविकांना मार्गाच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पायवाटीच्या कामाची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती. अखेर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक राकेश राणे यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत ही मागणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला.

नगरसेवक राकेश राणे यांनी स्वखर्चातून चिरेबंदी पायवाट बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत या कामाचे भूमिपूजन आज श्री देव स्वयंभू यांचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कामामुळे देवतरंग देवस्थळी जाणाऱ्या भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होणार असून परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला नगरसेवक राकेश राणे, गावपुरुष सदानंद राणे, अंबाजी राणे, माजी नगरसेवक किशोर राणे, चारू साटम, बाळा परब, प्रशांत साटम, विलास राणे, राजू गुरव, भुपेश राणे, नंदू देवळी, धीरज गावकर, मनोहर राणे, समीर राणे, दत्तात्रय मेस्त्री, संजय घाडी, दत्तात्रय राणे, मिलिंद पांचाळ, कार्तिक पिळणकर, अभय राणे, किशोर राणे, राजू चव्हाण, अनिकेत देसाई, श्रीराम राणे, प्रकाश मेस्त्री, दशरथ देसाई, बाळा राणे आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेवक राकेश राणे यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page