स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांची माहिती
देवगड ता.०८-: देवगड आगारातून लांबपल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यांबरोबर ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर सहा. वाहतूक निरीक्षक लवु सरवदे यांना यश आल्याने व ग्रामीण भागातील जनतेची सोय केली त्या मुळे ग्रामीण भागात प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागतील प्रवाशांची सोय केल्याबद्दल देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यानी देवगड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,लवू सरवदे यांचे अभिनंदन केले असून सेवेत रुजू झालेल्या कर्मचारी यांचेही कौतुक केले आहे.या ग्रामीण फेऱ्या लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली होती . या मागणीला यश आले आहे यावेळी चंद्रकांत पाळेकर,शरद शिंदे,अभय बापट उदय रुमडे,कृष्णा परब तात्या वाळके
