⚡सावंतवाडी ता.१९-: आजगाव येथील श्री देव रवळनाथ वर्धापनदिन सोमवार २२ जून रोजी संपन्न होत आहे.यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता महाअभिषेक व धार्मिक विधी ,सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद,दुपारी २ वाजता महाप्रसाद .
तरी सर्व भाविका भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गांवकर मंडळी व समस्त आजगांव ग्रामस्थ यांनी केले आहे.
आजगाव श्री रवळनाथ देवाचा वर्धापन दिन २२ रोजी…
