Headlines

दाभोली येथीलअंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर…

वायंगणी पं. स. सदस्या शीतल राऊत यांच्या पाठपुराव्याला यश..

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला तालुक्यातील निमुसगा ते दाभोली कार्यक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्तानजीक विद्युत वितरण मार्फत अंडरग्राउंड वीजवाहिन्यांचे काम सुरू असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. हे काम योग्य रीतीने व योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावे, यासाठी भाजपच्या वायंगणी पंचायत समिती सदस्य शितल राऊत यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच याबाबत वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनीही पाहणी केल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी शासनास व संबंधित विभागास सूचित केले होते. दरम्यान संबंधित विभागामार्फत हे काम करण्यात येत असल्याने वायंगणी पं. स. सदस्या शितल राऊत यांच्या कार्यतत्परतेबाबत नागरिकांतून व वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page