Headlines

निगुडे पाटीलवाडीतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा

स्थानिकांमध्ये खळबळ *⚡बांदा  ता.०३-:* निगुडे – पाटीलवाडीतील घरांना सावंतवाडी तहसील प्रशासनाने पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाडीत एकच खळबळ उडाली आहे. नुकसान भरपाई देणे टाळण्यासाठी प्रशासनाची धडपड असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या बांधणीसाठी टाकलेल्या मातीच्या भरावामुळे पूरस्थिती येत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.     निगुडे – पाटीलवाडीत सुमारे २०…

Read More

मालवणात २३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

मालवण ता.०३-:* मे महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील २३३ वाहनचालकांवर १ लाख ६५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई…

Read More

आचरा रामेश्वर वाचन मंदिरात ६ रोजी ग्रंथप्रदर्शन

*⚡मालवण ता.०३-:* आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे सोमवार दि.६ जून रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता ‘शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इतिहास विषयक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. सर्व इतिहासप्रेमींनी व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.श्रीकांत सांबारी व कार्यवाह श्री.अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

Read More

मालवण भाजप कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांना वाहिली आदरांजली

मालवण ता.०३-:* मालवण भाजपा कार्यालयात भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृती दिन संपन्न झाला. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, माजी जि. प….

Read More

“वाचणारी कणकवली आम्ही वाचवू”, “एकच आप्पा बाकी साऱ्या गप्पा”

कणकवली नगर वाचनालय बचाव रॅली धडकली; जोरदार घोषणाबाजी कणकवली ता.०३-:* कणकवली नगर वाचनालय बचाव या टॅगलाईन खाली शिवसेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक ते नगर वाचनालय अशी जनजागृती रॅली काढत याबाबत जनजागृती करण्यात आली. आमदार नितेश राणे अध्यक्ष असलेल्या या नगरवाचनालयात ३५ हजार पुस्तके धूळखात पडत असल्याचा आरोप करण्यात आला. वाचन संस्कृती टिकावी व आप्पासाहेब पटवर्धन…

Read More

वेर्ले सैनिक भवन येथे आजी माजी सैनिकांकडून लडाख येथील शहिदांना वाहण्यात आली श्रद्धांजली

सावंतवाडी ता.०३-:देशाचे रक्षण करण्यासाठी सीमेवर जाताना लदाख येथील अती दुर्गम भागात बसला अपघात होऊन देशाचे जवान शहीद झाले. या वीर जवानांना वेर्ले येथील सैनिक भवन येथे आजी माजी सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्याच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी आजी माजी सैनिक, वेर्ले गावचे सरपंच सुभाष राऊळ उपस्थित होते.

Read More

वेंगुर्ला, सावंतवाडी मच्छीमार्केटची पाहणी करूनच कुडाळात मच्छीमार्केट उभारा

उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे भाजपची मागणी कुडाळ ता.०३-:* कुडाळ शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या मच्छिमार्केट इमारत बांधण्यापूर्वी नगरपंचायत येथील सर्व नगरसेवकांनी संबंधित विभागातील प्रशासन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सोयींनीयुक्त बांधलेले वेंगुरला नगर परिषद आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या मच्छीमार्केट इमारतीची पाहणी करून त्याठिकाणी मच्छी विक्रेत्यांची चर्चा करून त्यातील त्रुटी व अडचणी दूर करून दर्जेदार वास्तू बांधावी…

Read More

ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे दुःखद निधन

*⚡सावंतवाडी ता.०३-:* न्यू सबनीसवाडा कुडतरकर टेंब येथील ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले,ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,मुली, जावई ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख पासून पक्षाच्या विविध समित्या वर त्यांनी काम केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या मध्ये त्यांचा समावेश होता. या वयातही ते…

Read More

मडुऱ्यातील वीज समस्या पंधरा दिवसांत न सोडवल्यास उपोषण

यशवंत माधव यांचा इशारा : अधिकाऱ्यांना मिळणार जशासतसे उत्तर बांदा ता.०३-:* मडुरा गावातील वीज समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. समस्या दूर करणे सोडाच पण गेलेली वीज किती दिवसांत परत येईल याची खात्री देणारा एकही अधिकारी नाही. मात्र उडवाउडवीची उत्तरे देणारे कर्मचारी व अधिकारी आहेत. येत्या पंधरा दिवसांत गावातील सर्व वीज समस्या मार्गी न…

Read More

कणकवलीतील ९ जि. प.तर १८ पं.स. मतदारसंघ नवीन प्रभाग रचना जाहीर

आक्षेप ८ जूनपर्यंत नोंदवाविण्याचे आवाहन कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.त्यामुळे निवडणूक हालचालीना वेग आला आहे.या प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.त्यावर हरकती ८ जून पर्यत नोंदवण्याचा कालावधी आहे. कणकवली तालुक्यात पूर्वीच्या आठ जिल्हा परिषद मतदार संघांमध्ये बद्दल होवून नववा नांदगाव जिल्हा…

Read More
You cannot copy content of this page