⚡मालवण ता.१९-:
अखिल भारतीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हाभरात साजरा करण्यात आला. या अंतर्गत मालवण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मालवण ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडीस, ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण तळवडेकर, मधुकर लुडबे, महिला शहराध्यक्षा सौ. रुपाली फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
