ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे दुःखद निधन

*⚡सावंतवाडी ता.०३-:* न्यू सबनीसवाडा कुडतरकर टेंब येथील ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण कुडतरकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले,ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले ,मुली, जावई ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख पासून पक्षाच्या विविध समित्या वर त्यांनी काम केले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या मध्ये त्यांचा समावेश होता. या वयातही ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत होते. हल्लीच जुने शिवसैनिक, चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला होता.

You cannot copy content of this page