मालवण ता.०३-:* मे महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील २३३ वाहनचालकांवर १ लाख ६५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. शहरात ट्रीपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.
मालवणात २३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
