⚡मालवण ता.१९-:
स्वच्छ मालवण, सुंदर मालवणसाठी मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कारवाई चा धडाका कायम ठेवला आहे. प्रदूषणमुक्त मालवण ठेवण्यासाठी नगर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील धुरीवाडा येथील अब्दुल रहीम अब्दुल खान यांनी प्लास्टिक, टायर व वायर जाळल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करुन ५ हजाराचा दंड वसूल केला आहे .
ही कारवाई स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम आनंद वळंजू व मुकादम बाळकृष्ण जाधव यांनी केली. तीन दिवसांपूर्वी बांगीवाडा येथे देखील रात्रीच्या वेळी नगर पालिकेमार्फत प्लास्टिक जाळल्या प्रकरणी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आज देखील धुरीवाड्यात या कारवाईची पुनरावृत्ती केली गेली असून आरोग्य व स्वच्छता विभागाने प्रदूषणमुक्त मालवण मोहीम अधिक आक्रमकपणे हाती घेतल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे
